पुष्कळदा पाहिलंय
भावनांची हेळसांड होताना
अजूनही गळा भाजून जातो
गारठलेलंही पाणी घोटताना
एरवी-तेरवी लोकांच्या भाऊगर्दित मिरवणारे आपण कधी एकांत पसंत करतो. जगातल्या नाना विचारांना थोपवत अचानक स्वतःशीच बोलू लागतो. हाच असतो मनाशी संवाद! पण त्याची जाणीव असतेच असं नाही. पण हीच गोष्ट जाणीवपूर्वक व्हावीशी वाटते. दुस-याच्या मनात असणारा 'मी' आणि आपल्या मनात असणारा 'मी' पुन्हा-पुन्हा तपासावा लागतो. म्हणूनच शोध सूरू होतो तो 'मी' माझ्यातला..